Ladki Bahin Yojana December Update: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुती सरकारला प्रचंड बहुमताने निवडून आणून पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने 230 पेक्षा जास्त जागा जिंकून राज्यातील निवडणुका एकतर्फी जिंकल्या आहेत. या निवडणुकीत “लाडकी बहीण योजना” सुपरहिट ठरल्याने लाडक्या बहिणींचा कौल महायुतीकडे गेला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणीला भेटण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सांगितले.
वर्षा बंगल्यावर झालेल्या लाडकी बहिणीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. तर, एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना संदर्भात कोणती मोठी घोषणा केली आहे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री शिंदेने मानले आभार
वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणीचे स्वागत करत लाडकी बहीण सुपरहिट व गेम चेंजर ठरल्याने महायुतीला मोठा कौल जनतेने दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. Ladki Bahin Yojana December Installment लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे या योजनेमुळे विरोधकांना धडकी बसलेली आहे. विरोधकाला आता विरोधी पक्ष नेता बनवण्यासाठी पण संख्याबळ नाही अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहिणीवर कौतुकाच्या वर्षाव केला.
लाडक्या बहिणीच्या हप्ता वाढवण्याच्या केली घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर लाडक्या बहिणीला भेटतांनी जाहीरनाम्यात केल्या गेलेल्या घोषणा लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही दिली. तसेच लाडकी बहीण योजनेचे1500 पंधराशे रुपये मानधन एवजी 2100 रुपये प्रति महिना मानधन करण्याची घोषणा पण त्यांनी यामध्ये केली. Ladki Bahin Yojana December 2100 Installment यंदा लाडक्या बहिणीची लाट संपूर्ण राज्यात असल्यामुळे हा चमत्कार घडल्याची बिग वही त्यांनी दिली.
क्र. | पात्रता निकष |
1 | वय: 21 ते 65 वर्षे |
2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
5 | बँक खाते असणे आवश्यक |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |